ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हास्तर खो-खो खेलो इंडिया केंद्रास अनिल चोरमले;  उपसंचालक मुख्यालय, पुणे यांची सदिच्छा भेट

January 12, 202214:30 PM 38 0 0

जालना :- केंद्रशासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत खेलो इंडिया या योजनेमधून देशातील विविध जिल्हयामध्ये 1000 खेलो इंडिया सेंटर पुढील 4 वर्षामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. आयुक्त (खेलो इंडिया) यांना सादर केलेल्या प्रस्तावातील महाराष्ट्रातील प्रति जिल्हा एक खेळ याप्रमाणे खेलो इंडिया सेंटरसाठी मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयासाठी खो-खो या खेळाच्या केंद्राकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.  जालना जिल्हयातील खेलो इंडिया केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी घेऊन 12 वर्षाआतील 15 मुले, 15 मुली व इतर 10 खेळाडू असे एकुण 40 खेळाडू नियमीत जिल्हा क्रीडा सं़कुल, जालना येथे खो-खो खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

                 खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्रास दि. 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता उपसंचालक, मुख्यालय, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अनिल चोरमले, यांनी भेट देऊन खेळाडूं व पालकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या.
उपसंचालक अनिल चोरमले, हे स्वत: खो-खो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू असून खो-खो खेळाचे क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी व आता उपसंचालक पदावर पोहचलेले आहे. खेळाडूंना मार्गदर्शन करतांना खेळाडूच्या अंगी जिद्द, चिकाटी आत्मविश्वास असणे आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले. उपस्थित पालकांना खेलो इंडिया केंद्राची माहिती दिली व भविष्यात जालना जिल्हयातील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतील अशी आशा व्यक्त करून जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथील खेलो इंडिया खो-खो प्रशिक्षण केंद्रातून उत्कृष्ट प्रकारे खेळाडू घडतील अशा शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवराचे सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी बुके देऊन स्वागत केले. यावेळी जालना जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव डॉ. रफीक शेख, जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीचे प्रमोद खरात, सचिन दोरखे, सचिन मोहिते, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या रेखा परदेशी क्रीडा अधिकारी, महेश खर्डेकर, संतोष वाबळे, क्रीडा मार्गदर्शक, नवनाथ गायकवाड सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक, सोपान शिंदे, रमेश वारे, हारूण खान, सिमोन निर्मळ, राधा कांबळेसह खेळाडू पालक मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *