उरण (संगिता पवार ) रायगड जिल्हा काँग्रेस ची धुरा ज्या दिवसा पासुन महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्या दिवसापासुन खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनमध्ये नवंचैतन्य संचारले आहे. अनेक कार्यकर्ते हे पक्षा पासुन बाजूला झाले होते परंतु रायगड जिल्हा अध्यक्षपदी श्री. महेंद्र घरत साहेब.यांची नियुक्ती झाल्याने.लांब झालेले काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा काँग्रेस पक्षात यायला लागले आहेत. आज उरण तालुक्यातील सारडे या गावात उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली या मध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि महेंद्रजी घरत साहेब अध्यक्ष असलेल्या यमुना सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या. ऍम्ब्युलन्सच्या मार्फत उरण पूर्व विभागात मोफत सेवा देण्यासाठी व कोरोना काळात कोरोना पेशंटनां अहोरात्र मदत करणाऱ्या श्री समिर पाटील या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीला उप सरपंच बनविण्याचा महत्वकांशी निर्णय श्री. महेंद्रशेठ घरत साहेब यांनी व काँग्रेस कमिटीनी घेतला.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच समीर पाटील यांचे जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रजी घरत साहेब. यांनी सारडे गावात जाऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.शेवटी अहोरात्र मेहनत घेतलेल्या या कार्यकर्त्याला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. त्यांचा योग्य असा सन्मान आज झाला आहे.
या प्रसंगी सारडे गावातील श्री. सखाराम राजाराम पाटील, अजित धर्माजी पाटील, प्रमोद मणिराम पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्रजी घरत साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी महेंद्रजी घरत साहेब यांनी त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले.
यावेळी सारडे काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रकांत राजाराम पाटील व उपाध्यक्षपदी श्री. संकेत जगन्नाथ पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे हि जिल्हा अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी कोप्रोली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर श्री.सिद्धराम आरवती -पाटील यांच्या निःस्वार्थ वैद्यकीय जनसेवे बद्दल त्यांचा महेंद्रशेठ घरत साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष श्री. मिलिंदजी पाडगावकर साहेब, माजी जिल्हा परिषद सद्स्य श्री विनोद म्हात्रे, जेष्ठ काँग्रेस नेते. A. D पाटील गुरुजी, यशवंत घरत,उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा. सौ. रेखाताई घरत, इंटक रायगड जिल्हा अध्यक्ष. श्री किरिट पाटील, रमाकांत गावंड,उमेश भोईर,समाधान म्हात्रे, विजय म्हात्रे,लंकेश ठाकूर, उमेश ठाकूर,राजेंद्र भगत,योगेश म्हात्रे,महेश म्हात्रे, हरि गावंड, संदीप वर्तक,विवेकानंद म्हात्रे, मनोहर म्हात्रे, योगानंद म्हात्रे, शेखर ठाकूर, अजित ठाकूर, विवेक म्हात्रे, आनंद ठाकूर आदित्य घरत. व मोठया संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply