ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शे.का.प.च्या जिल्हा चिटणीस ( जिल्हाध्यक्षपदी) ॲड. रोहित बनवसकर

August 30, 202114:45 PM 19 0 0

जालना ( प्रतिनिधी) : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जालना जिल्हा चिटणीस (जिल्हाध्यक्ष) प्रभारी पदी सामाजिक चळवळीतील तरुण विधिज्ञ ॲड.रोहित सूर्यकांतराव बनवसकर यांची निवड करण्यात आली आहे.


विद्यार्थिदशेपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले ॲड. रोहित बनवसकर यांनी विद्यार्थ्यांवरील अन्यायाबाबत आवाज उठवून केलेली आंदोलने, समाज संघटन, वक्तृत्व कलेने जिंकलेल्या सभा, वकीली व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची तळमळ, या कौशल्यावर त्यांनी विविध पक्षांत काम करतांना जालना नगरपरिषदेचे स्विकृत नगरसेवक म्हणून मान मिळवला. त्यांचे सामाजिक जीवन व कार्याची दखल घेत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा विभागीय चिटणीस विकास शिंदे यांनी ॲड. रोहित बनवसकर यांची जालना जिल्हा चिटणीस ( जिल्हाध्यक्ष)प्रभारी पदी निवड केली आहे. जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी तालुका निहाय तसेच जिल्हा स्तरावर मेळावे घेऊन जिल्हा व तालुक्यांचा कार्यकारिणी घोषीत कराव्यात. असे त्यांना दिलेल्या निवड पञात नमूद केले असून या निवडीबद्दल ॲड. रोहित बनवसकर यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *