नांदेड – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला असून दि. १५ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला. जिल्ह्यात शिक्षक सेनेच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला उस्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला असून एकूण बारा तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक सेनेने एकूण ३३१६ झाडांचे वृक्षारोपण करुन त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. शिक्षक सेनेच्या जिल्हा , तालुका पदाधिकाऱ्यांनी अत्यंत हिरीरीने सहभाग नोंदवत हा वृक्षारोपण पंधरवडा यशस्वी केला. या उपक्रमाबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर व तानाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवडा दिवस साजरा झाला. या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झाला. या उपक्रमाबद्दल आमच्या शाळेसाठी झाडे उपलब्ध करून द्या आम्ही सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतो अशा प्रतिक्रिया जिल्हाभरातून आल्या. या उपक्रमासाठी शिक्षक सेनेचे सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांच्या सहकार्यातून खूप मोठ्या प्रमाणात बिलोली व धर्माबाद येथे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
जिल्ह्यातील बिलोली १८३०, धर्माबाद ५९०, लोहा १२४, देगलूर ९६, मुदखेड ५७, कंधार ६१, मुखेड १७३, अर्धापूर २१, नांदेड ५१, किनवट १६१, भोकर ५१, नायगाव १०१ या तालुक्यात एकूण ३३१६ एवढ्या विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण अनेक शाळांमध्ये करण्यात आले. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील सामुदायिक वृक्षारोपण व वैयक्तिक वृक्षारोपण संख्या दि. ३१ जुलै पर्यंत दिलेल्या लिंक वर भरवयाची आहे. तसेच वृक्षारोपण फोटो कॅप्शन करुन पाठवायचे आहेत. महाराष्ट्रातून वैयक्तिक एकानेच जास्तीत जास्त वृक्षारोपण केले असेल अशा आपल्या जिल्ह्यातील तीन क्रमांक प्रोत्साहनपर एक अशा शिक्षकाचे नाव शाळा, गांव, तालूका व जिल्हा तसेच वृक्षारोपण संख्येसह ३१ जुलै संध्याकाळ पर्यंत विभाग अध्यक्ष /निरीक्षक यांचे कडे पाठवण्याचे सुचविण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी पाठविलेले फोटो व संख्या पाहण्यात येऊन ५ ऑगस्ट रोजी त्याची छाननी केली जाईल आणि १५ ऑगस्ट रोजी बक्षिसे घोषित करुन वितरण केले जाणार आहे. सर्व विभाग अध्यक्ष /निरीक्षकांनी आपल्या विभागातील जिल्हयातील माहीती लिंक वर परिपूर्ण करून घ्यावी असेही राज्य शाखेने कळविले आहे.
Leave a Reply