ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा तंबाखु नियंत्रण पथकाची कारवाई 20 हजार रुपयांचा दंड वसुल

January 22, 202213:10 PM 38 0 0

जालना  :- जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक विनायक देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती .डॉ. ए.व्ही. भोसले अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. अजिंठेकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील विविध ठिकाणी अवैद्यरित्या गुटखा,तंबाखु, मावा, जर्दा,खररा आणि सुटटे सिगारेट इत्यादीची विक्री करणाऱ्या पान सेंटर वर तंबाखु नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पान टपरी धारकांवर जिल्हा तंबाखु नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे धाडी टाकण्यात आल्या

यामध्ये एकुण 24 पान ठेल्यावर कार्यवाही करुन एकुण 20 हजार रुपये ऐवढा दंड वसुल करण्यात आला ही कार्यवाही या पुढेही जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी करण्यात येणार आहे. तरी पान टपरी धारकांनी अवैद्यरित्या कुठल्याही तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करु नये.
या कारवाईच्यावेळी अन्न व औंषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. अजिंठेकर स्थानिक गुन्हे शाखा अधिनिस्त पोलीस अंमलदार फुलचंद हजारे , देविदास भोजने ,सुधिर वाघमारे, सचिन राऊत व जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सोनाजी भुतेकर मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती भाग्यश्री राठोड इत्यादीची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *