जालना (प्रतिनिधी) जूना जालना, उड्डाणपुलालगतच्या जागृत अमृतेश्वर महादेव मंदीरास सोमवारी (दि.28) दिवापेटी दानशुर जितेंद्र मदनलाल अग्रवाल यांनी भेट दिली. यावेळी जितेंद्र अग्रवाल यांचा गणेश सुपारकर व इतरांनी सत्कार केला.
शहरातील मोदीखाना भागातील रहिवाशी स्वर्गीय मदनलाल अग्रवाल व मौनाबाई मदनलाल अग्रवाल यांच्या इच्छेनुसार जितेंद्र अग्रवाल यांनी अमृतेश्वर महादेव मंदीरात दिवापेटी भेट देवून बसवून घेतली.
यावेळी गणेश सुपारकर, माजी नगरसेवक राम सतकर, राहुल सुपारकर, गणेश हेलगट, संतोष सुपारकर, आनंद ओम अग्रवाल, राजु खुदभैय्ये, राकेश प्रदीप धारीवाल, नवीन राठौर आदिंची उपस्थिती होती.
Leave a Reply