ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिवेकर यांना अतिरिक्त कार्यभार द्यावा- ऍड.ब्रम्हानंद चव्हाण

March 24, 202113:51 PM 9 0 0

जालना-प्रतिनिधी जालना जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रजनीकांत दिवेकर हे परतूर येथे कार्यकरत आहेत. यांना परतूर येथे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला नाही. मागासवर्गीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्यावर राजकीय दबावामुळे अन्याय झाला असून, उपअभियंता रजनीकांत दिवेकर यांना अरितरिक्त कार्यभार द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जालनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी प्रताप सवडे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आले.

या निवेदनात वरिल मागणी मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जालनाच्या वतीने दिनांक 30 मार्च 2021, मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेपासून लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद जालना समोर उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना व शासन जवाबदार राहील असे शेवटी या निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष ऍड.ब्रम्हानंद चव्हाण यांच्या सोबत जालना जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे, जालना शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, युवा जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष राजेंद्र भिंगारदिवे, लहु उघडे, दिपक मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *