गेला जसा इलाही सोडून माणसांना
भावूक शेर झाले शब्दांस माळतांना !!
सोसू कसा अता मी गझलेतला दुरावा
शृंगार हा फुकाचा वाटेल आरशांना !!
वाचून कैक रडलो गझला तुझ्या इलाही
रोकू कसे अता मी डोळ्यांत आसवांना !!
बोलून खूप झाले बरसात आठवांची
आकाश फाटले रे पाऊस गाळतांना !!
रुसली फुले कळ्या ही नाराज गंध झाला
रडतात चंद्र तारे आकाश पाहतांना !!
सांधू अता कसे मी भेगाळल्या मनाला
रडवेल मोगरा तो गझलेत गुंफतांना !!
थिजलेत आज आश्रू डोळ्यांत ही उदयच्या
गेलास का इलाही हलवून काळजांना !!
उदय बरडे.नांदेड.
Leave a Reply