ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दिव्यांगांचे जेष्ठ मार्गदर्शक दिवंगत महादेव बाबांच्या पुण्याईने मिळाला उरणच्या दिव्यांग बांधवाला इलेक्ट्रिक सायकलचा आधार

October 27, 202114:00 PM 62 0 0

अश्विनी निलेश धोत्रे
माऊली अपंग संघटनेच्या माध्यमातून उरणच्या दिव्यांगाना न्याय मिळून देणारी माऊली म्हणजे खोपटे गावातील दिवंगत महादेव रामदास पाटील यांची ओळख ही समस्त रायगड च्या दिव्यांगाना आणि शासकीय यंत्रनेत नक्कीच होती. जिथे अन्याय झाला तिथे आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडण्याचा काम हे महादेव पाटील यांनी सातत्याने केले याची प्रचिती दिव्यांगाना नकीच आहे. बाबांच्या जाण्याने उरण च्या दिव्यांगांची मोठी हानी झाली आहे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन हे दिव्यांनाच्या सातत्याने कामी येत असत.त्यांची प्रेरणा घेऊन महादेव बाबांच्या नेतृत्वात उरण तहसील कार्यालया बाहेर झालेल्या उपोषणामुळे शेकडो दिव्यांग बंधू भगिनींना प्रमाणपत्र आणि अंत्योदय कार्ड चे वाटप झाले हे बाबाच्या नेतृत्वाचा मोठं फलित होतं .


मात्र बाबांच्या मृत्यूने त्यांची दिव्यांगाना कमतरता भासू नये यासाठी त्यांची जाणकार पत्नी अपर्णा महादेव पाटील(बाबांची लाडकी सोना)पुत्र हरेश पाटील आणि समीर पाटील यांनी आपल्याच तालुक्यातील दिव्यांग बांधव हा आपल्या उदरनिर्वाहासाठी वाटसरू सारखा जीवन जगत आहे हे लक्षात घेऊन बोकडवीरा गावातील “आप्पा देवराम वाहुले” यास बाबांची इलेक्ट्रिक सायकल देण्याचा निर्णय घेतला आणि तालुक्यातील दिव्यांग प्रतिनिधीना याची माहिती देऊन आज सोमवार दि.25 ऑक्टोबर 2021 रोजी दिव्यांग बांधव आप्पा वाहुले यास बाबांची इलेक्ट्रिक सायकल स्वाधीन केली आणि मोठा आधार दिला.
यावेळी बाबांच्या पत्नी अपर्णा पाटील, मुलगा हरेश पाटील,समीर पाटील आणि कुटुंबातील सर्व मंडळीच्या उपस्थितीत माऊली अपंग संघटनेचे दीपक म्हात्रे, संतोष म्हात्रे,दिव्यांग प्रतिनिधी महेंद्र म्हात्रे,राजेश भोईर,रणीता ठाकूर,संदेश राजगुरू,मिळटन मिरंडा,हिरावती घरत यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली.यावेळी दिव्यांग प्रतिनिधिनी महादेव बाबांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *