ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला पन्नास वारकरयात परवानगी द्या, नसता हजारो वारकरी आळंदी येथे २ जुलै रोजी आंदोलन करणार- हभप रमेश महाराज वाघ

June 17, 202112:33 PM 9 0 0

जालना – वार्ताहर महाराष्ट्रात हजारो वर्षा पासून सुरु असलेला साधू संताचा पालखी सोहळा कोरोनाच्या महामारीने गेल्या वर्षा पासून बंद आहे,शासनाने सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिली असून वारकर्याचे श्रद्धास्थान असलेले संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला शासनाने पन्नास /पन्नास वारकरयात पायी पालखी काढण्याची परवानगी २५ जून पर्यंत द्यावी नसता हजारो वारकरी २ जुलै रोजी आळंदी येथे टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करणार असल्याचे प्रतिपादन वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप रमेश महाराज वाघ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केले

या वेळी वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर म.जाधव,संपर्क प्रमुख भास्कर म. हरबक,मराठवाडा संपर्क प्रमुख दादाराव म. पाटील, कार्याध्याक्ष विष्णू म.बारड,तालुकाध्यक्ष प्रकाश म. उमरे, तालुका उपाध्यक्ष अंबादास म.जाधव, सिद्धेश्वर म. शिंदे, दतात्रय म. शेळके, यांची उपस्थिती होती, पुढे बोलतांना वाघ महाराज म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाच्या सोबत व राज्याचे उप मुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या प्रमुख मंडळी यांनी चार वेळी बैठका संपन्न झाल्या परंतु हे शासन वारकरी संप्रदायाच्या विरोधात कार्य करणारा शासन आहे असं वारकरी संप्रदायाचे निदर्शनास आले असून आहे गेल्या पंधरा महिन्यापासून धार्मिक उत्सव कार्यक्रम व मंदिर बंद आहेत, तरीही वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक भक्तांनी शासनाने घातल्याने नियमाचे आत्तापर्यंत पालन केलेले आहे परंतु आता महाराष्ट्र सरकारला सर्व काही अनलॉक केले असून संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला शासनाने परवानगी न दिल्यास आळंदी येथे हजारो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करणार असून या वेळी काही अघटीत प्रकार घडल्यास सर्व जबाबदार शासनावर राहील असे हि या वेळी रमेश महाराज वाघ यांनी बोलताना सांगितले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *