ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न राहिल्याने व्यक्तीवर होतो नकारात्मक परिणाम ?

September 25, 202113:21 PM 72 0 0

व्हिडिओ गेम्स आणि फेसबुक’यांसारखी सामाजिक संकेतस्थळे आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. त्यांत सर्वांचा पुष्कळ वेळ जातो आणि त्यांचा आपल्या जीवनावर पुष्कळ प्रभावही पडतो. व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक संकेतस्थळे यांचा शारिरीक आणि मानसिक स्तरावर होणार्‍या परिणामांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही हानीकारक परिणाम होतात, असे संशोधनात आढळले आहे, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’, श्रीलंका (The International Institute of Knowledge Management (TIIKM), Sri Lanka) यांनी आयोजित केलेल्या ‘द एद्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्टस् अँड ह्युमॅनिटीज्, 2021’ (The 8th International Conference on Arts and Humanities (ICOAH) 2021, Sri Lanka) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘व्हिडिओ गेम्स खेळणे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे सूक्ष्म परिणाम’ हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आहेत, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. या परिषदेत 20 हून अधिक देशांतील 60 हून अधिक शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. यापैकी 5 सादरकर्त्यांना ‘उत्कृष्ट सादरकर्ता’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले. यामध्ये श्री. शॉन क्लार्क यांची निवड करण्यात आली आहे.


महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने विविध वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर केलेले हे 79 वे सादरीकरण होते. यापूर्वी विश्‍वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 63 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी 6 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विश्‍वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री. क्लार्क यांनी ‘प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्र’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)) आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून ‘व्हिडिओ गेम्स’ खेळणे अन् सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न रहाणे यांचे होणारे सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल दिलेली माहिती संक्षिप्त रूपात पुढे दिली आहे.
1. ‘यू.ए.एस्.’च्या आधारे व्हिडिओ गेम्स खेळण्याच्या परिणामाचा अभ्यास : संशोधन केंद्रात निवास करणार्‍या 5 साधकांना केवळ एक घंटा एक आक्रमक ‘व्हिडिओ गेम’ (फर्स्ट पर्सन शूटर व्हिडिओ गेम) खेळायला सांगण्यात आले. हा गेम खेळण्याआधी, तसेच नंतर साधकांचे ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. गेम खेळल्यानंतर या पाचही साधकांमधील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली किंवा त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा कमी झाली, असे आढळले. त्यापैकी ज्या 2 साधकांमध्ये गेम खेळण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा नव्हती, त्यांत गेम खेळल्यानंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यांपैकी आधीच आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधकातील नकारात्मक ऊर्जा 72 टक्क्यांनी वाढली.
2. ‘यू.ए.एस्.’च्या आधारे सामाजिक संकेतस्थळ पाहाण्याच्या परिणामाचा अभ्यास : संशोधन केंद्रात निवास करणार्‍या 5 साधकांना त्यांच्या नेहमीच्या सामाजिक संकेतस्थळावरील खात्यातील पोस्ट एक घंटा पहायला सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर या पाचही साधकांचे ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या आधारे मापन करण्यात आले. साधकांनी केवळ त्यांच्या ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्रॅम’ खात्यातील पोस्ट पाहिल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा 15 ते 30 टक्के वाढल्याचे आढळले.
3. ‘यू.ए.एस्.’च्या आधारे आध्यात्मिक संकेतस्थळ पाहाण्याच्या परिणामाचा अभ्यास : वरील गटातील 2 साधकांना ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संशोधन आणि साधना मांडणार्‍या संकेतस्थळाच्या ‘फेसबुक’ खात्यातील पोस्ट पहायला सांगण्यात आले. पहाण्यापूर्वी आणि नंतर केलेल्या मापनातून लक्षात आले की, या साधकांतील नकारात्मक ऊर्जा घटली, तर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यावरून सामाजिक संकेतस्थळावर आपण नेमके कशा प्रकारचे साहित्य पहातो, हा पहाणार्‍यावर कोणता परिणाम होणार, हे ठरवणारा महत्त्वाचा निकष असल्याचे लक्षात आले.
‘व्हिडिओ गेम्स’ आणि सामाजिक संकेतस्थळे यांचा आपण कसा वापर करतो आणि त्या माध्यमातून काय पहातो यावर त्यांचा आपल्यावर सकारात्मक की नकारात्मक परिणाम होणार हे ठरते. दुर्दैवाने बहुतांश व्हिडिओ गेम्स आणि सामाजिक संकेतस्थळांवरील पोस्ट नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतात. काय पहातो याबद्दल आपण जर सतर्क राहिलो, तर ते हानीकारक होण्याऐवजी आपल्या आध्यात्मिक उन्नतीला पूरक होऊ शकेल

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *