ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

खुरगावला आज दान पारमिता महोत्सवाचे आयोजन

July 6, 202213:00 PM 24 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरात असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त दान पारमिता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ६ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार असून या महोत्सवात धम्मध्जारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण धम्मदेसना, व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान, विशेषांकाचे प्रकाशन, अभिष्टचिंतन आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासाठी समाजाच्या आर्थिक सहकार्यातून प्रशिक्षण हाॅल, भिक्खू निवास, कार्यालय हे बांधकाम झाले आहे. तसेच इथे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सद्यस्थितीत अकरा फुटांची संगमरवरी दगडाची अखंड पाषाणात कोरलेली बुध्दमूर्ती तयार झाली आहे. त्याला १० लाख रुपये खर्च आला आहे. हेही उपासकांच्या दान पारमितेतून झाले आहे. आता बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी बावीस लक्ष रुपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे. तेव्हा हे ऐतिहासिक धम्मकार्य आपल्या सर्वांच्या हातून घडण्यासाठी आज ६ जुलै रोजी श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त दान पारमिता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भिक्खू संघरत्न, भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुयश, भंते सुगत, श्रामणेर सारीपुत्त, संघानंद, सुजात, सुधम्म व सर्व भिक्खू संघ, श्रामणेर संघ यांनी केले आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *