ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डोंगरी सुभा भंडारी चषक कबड्डी स्पर्धा आयोजन संपन्न

May 4, 202213:14 PM 22 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरूड तालुक्यातील डोंगरी सुभा संस्थेच्या वतीने भव्य भ॓डारी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री गणपती व महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यावेळी भंडारी समाजातील उच्च पदावर कार्यरत असणा-या व विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्याचा ग्रामस्थ मंडळाकडून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी राजनभाई नार्वेकर कातळवाडा अध्यक्षअखंड भारतीय भंडारी समाज अलिबाग,मुरुड तालुका शिवसेना प्रमुख ऋषीकांत डोंगरीकर, राष्ट्रपती पुरस्कर्ते सुहास तोडणेकर यांना सन्मानित करण्यात आले

स्पर्धेचे उदघाटन माजी सरपंच नागाव नंदकुमार मयेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. मुरुड जंजिरा नगरपरिषद माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील,शिवसेना तालुका प्रमुख ऋषीकांत डोंगरीकर,माजी सभापती स्मीता खेडेकर,नागाव सरपंच निखील मयेकर,हर्षदा मयेकर,वृषाली डोंगरीकर,उद्देश वाडकर ,राजन वाडकर,प्रशांत जाधव,राकेश पाटील,मंगेश पुलेकर श्रीकांत सुर्वे, मोहन करंदेकर, पत्रकार उदय खोत,मदनदादा हणमंते याच बरोबर ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्थेचे सर्व पदाधिकारी ,अध्यक्ष मच्छिद्र नाईक,उपाध्यक्ष मंगेश पुले कर सचिव संजय भोसले,जितेंद्र खेचर,संजय डपे,महिला अध्यक्षा मानसी भोसले,उपाध्यक्षा मानसी नाईक,सचिव भाविका सतविडकर, याच्या उपस्थितेत संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .जान्हवी खेऊर दिप्ती खेऊर,संचिता भोसले,सायली भोसले,दक्षता नाईक,मनाली पुलेकर, सानिका डपे, प्रतिक्षा भोसले कल्पीता ,रूचीता,सायली नाईक तसेच जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य चेतन ,साहिल ,विराज खेऊर,मंदार मुंबईकर, सिद्धेश नाईक,नरेंद्र सतविडकर सिध्देश , अनिरुद्ध ,ऋतिक भोसले यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयी खेऊर यांनी केले.सूत्रसंचालन मानसी नाईक यांनी उत्तम केले.
मच्छिद्र नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *