ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दाता

October 16, 202114:10 PM 41 0 0

दीन दलितांचा|
तुम्ही झाले दाता|
टेकवावा माथा||
तव पदी ||१||

रंजल्या गांजल्या |
दिले हक्क सारे|
गलिच्छ ते वारे ||
केले दूर ||२||

तळे चवदार|
केला सत्याग्रह |
तोडूनीया कट||
कुविचार ||३||

शिका संघटीत |
एक व्हारे सारे |
घूमविले नारे ||
एकी पाई ||४||

नागपुरी वाजे |
धम्म दीक्षा डंका |
जागे केले लोका ||
धम्म नवा ||५||

धर्म परिवर्तन |
झाले नागपुरी |
पंथ बौध्द भारी ||
सर्व श्रुत ||६||

संघमित्रा सांगे|
महती महान|
सदैव वंदूनी ||
बुद्ध, भीमा ||७||

संघमित्रा सोरटे.
माळशिरस. सोलापूर.

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *