ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसींचा अंत पाहू नका ! ओमप्रकाश चितळकर यांचा इशारा  राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलन

July 5, 202112:18 PM 57 0 0

जालना ( प्रतिनिधी) : राज्यशासनाने इंपिरिकल ( अनुभव लिखीत) डाटा वेळेवर सादर न केल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गंडांतर आले.तथापि महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा अंत पाहू नये, आगामी तीन महिन्यांत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता सर्वोच्च न्यायालयात सादर करून ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे .नसता राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक ,माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका होऊ देणार नाही .असा खणखणीत इशारा रासपचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांनी आज येथे बोलताना दिला .

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणास स्थगिती मिळाल्या च्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक ,माजी मंत्री महादेव जानकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे, महासचिव बाळासाहेब दोडताले यांच्या नेतृत्वाखाली रासपा तर्फे रविवारी ( ता. ०४) संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अंबड चौफुली येथे पक्षाचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
ओम प्रकाश चितळकर यांनी , ओबीसींच्या राजकीय आरक्षणास स्थगिती मिळण्यास राज्य शासनाचा गालथान कारभार कारणीभूत असल्याची टिका त्यांनी केली. राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेची कामे तातडीने सुरू करावी, अनुभव लिखित डाटा न्यायालयात तात्काळ सादर करण्यात यावा, तसेच ओबीसी आरक्षणास स्थगिती मिळेपर्यंत कुठल्याच निवडणुका घेऊ नयेत नसता पक्षाच्यावतीने आगामी एकही निवडणूक होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा ओमप्रकाश चितळकर यांनी यावेळी बोलताना दिला .
‘ आरक्षण आमच्या हक्काचं..नाही कुणाच्या बापाचं.. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा…राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो…,महादेव जानकर तुम आगे बढो,,,हम तुम्हारे साथ है…! अशा गगनभेदी घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला. आंदोलनात मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भोजने, युवा जिल्हाध्यक्ष गोविंद जाधव,ॲड संभाजी चुनखडे, शिवाजी तरवटे, रामेश्वर काळे, संदीप पवार , संतोष कोल्हे, गजानन वाईसे, यांच्यासह पक्षाचे जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले . रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *