जालना येथील मत्स्योदरी विद्यालयातील सहशिक्षक असलेले नागेश नागलवाड यांना जुळ्या रिद्धी व सिद्दी या गोड बालिका आहेत.ज्या समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही म्हण आहे.त्याच समाजातील श्री व सौ.नागलवाड दांपत्यांचा प्रत्येकास अभिमान वाटेल असेच कार्य करून समाजासमोर नवा आदर्शवत पायंडा निर्माण केला आहे.
प्रत्येक जण आपापल्या परीने बालिका जन्माचे स्वागत करतात पण या अवलियाने पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत मुली जन्माचे स्वागत (२० ऑक्टोबर) रक्तदान करून आगळ्यावेगळ्या उपक्रमाने केले आणि तोच वसा नित्यनेमाने आजपर्यंत जपत आले आहेत.आणि हो सार्थ अभिमान वाटावा असेच कार्य आपले पतीदेव करताय त्यांचा कित्ता आपणही गिरवावा व रक्तदान करून,रक्तदान चळवळीस गतीमानता प्राप्त करून देण्यासाठी आपल्या यजमानांकडे हट्ट धरला व मलाही रक्तदान करायचेच आहे असा हट्टच धरला सलग आठ दिवस आणि हो याच कारणास्तव घरात छोट्या मोठ्या कुरूबुरी चालु झाल्या. यातुन मार्ग श्रीमतीनींच काढत असे सुचविले की मला शाँपिंग ला नेऊ नका पण रक्तदान जरूर करू द्या.
आणि मग योग जुळुन आणण्याकामी शंभर शिक्षक क्लबने पुढाकार घेत निमित्त वाढदिवसाचे संकल्प रक्तदानाचा या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले. आणि मग या शिबीराच्या माध्यमातून श्री.व सौ.नागलवाड दांपत्यासह 19 रक्तदात्यांनी रक्तदान करून या समाजोपयोगी उपक्रमात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. हे शिबीर आयोजनासाठी आर.आर. जोशी,जमीर शेख,जगदीश कुडे , दत्तात्रय राऊतवाड,दत्ता देशमुख,संदिप इंगोले इत्यादी नी परिश्रम घेतले
Leave a Reply