ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारासाठी 27 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

March 25, 202214:00 PM 37 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) : भारत सरकाच्या सामाजिक न्याय आणि अधिकरिता मंत्रालयांतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, दिल्ली याच्यावतीने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 27 मार्च 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
समाजातील दुर्बल घटकांचे पुनरुत्थानासाठी कार्य करणे, वंचित घटकांचे जीवनमान उंचण्यासाठी केले गेलेले उल्लेखनीय कार्य यांचा पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये समावेश आहे. पुरस्कारासाठीचा अर्जाचा नमुना http://daic.gov.in व http:// socialjustice.nic.in या संकेतस्थळावर भेट देवून नियम तसेच अटी आदींची माहिती करुन घ्यावी. अर्ज संचालक, डॉ. आंबेडकर फाऊंडेशन, 9 वा मजला जीवनप्रकाश इमारत, 25 केजी मार्ग, कनॉट प्लेस, नवी दिल्ली-110 001 या पत्त्यावर दिनांक 27 मार्च 2022 पर्यंत करावेत, असे आवानही श्री. उबाळे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *