जालना (प्रतिनिधी) ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार दिन म. ज्यो. फुले समाजकर्ते महाविद्यालय, जालना येथे साजरा करण्यात आला. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. ब्रम्हानंद चव्हाण हे होते. प्रमुख अतिथी डॉ. एस. आर. कहाडे तर डॉ. सुवर्णा चव्हाण, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. आर. एन. हिवराळे, डॉ. पी. व्ही. वनंजे, डॉ. पी. टी. शिंदे, डॉ. बी. आर. राठोड, आर. एस. खरात, डब्ल्यु. आर. वाघ, आर. टी. झोरे, के. जी. कुरंगळ, एम. मदन, ग. स. मेहेत्रे, आय. ए. शिंदे, पी. बी. भालमोडे हे होते तर नामविस्तार दिनास भरीव योगदान दिल्याबद्दल सर्व कर्मचार्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अॅड. सिध्दार्थ चव्हाण, आश्रुबा बनसोडे, डॉ. बी. ई. गवळी, माघाडे काका उपस्थित होते. त्यात महाविद्यालयाचे प्रा. पी व्ही. वनंजे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाची पी. एच. डी. प्रदान केल्यामुळे त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव अॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आर. एन. हिवराळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. एम. डब्ल्यु. खरात, रोडे यांनी सहकार्य केले.
Leave a Reply