ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाला प्रवेश दिन उत्साहात संपन्‍न

November 10, 202117:01 PM 11 0 1

जालना : शहरातील जाणीव अस्मितेची साहित्य परिषद, जेष्ठ नागरिक विचारमंच तर्फे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन रविवारी ( ता.सात ) साजरा करण्यात आला. शहरातील सतकर नगरात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसाप शाखेचे अध्यक्ष प्रा.रमेश भुतेकर हे होते. या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.राजकुमार बुलबुले,जेष्ठ कवी राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात पहिल्या सत्रात प्रा.राजकुमार बुलबुले यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य आजच्या सामाजिक परिस्थितीत कसे अपरिहार्य आहे यावर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात प्रा.रमेश भुतेकर यांनी सांगितले की, शिक्षण प्रवाहात विद्यार्थी क्षमताचा विचार करून शैक्षणिक बाबीचा विचार व्हावा असे सांगून महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा युवापिढीने जोपासला पाहिजे,असेही सांगितले. कवी- पत्रकार डाॅ.सुहास सदाव्रते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कविसंमेलनात कवयित्री रेखा गतखणे-जाधव, उषा बोर्डे, कवी मनिष पाटील, संजय सरदार यांचे कविसंमेलन रंगले. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन हर्षदा गायकवाड यांनी केले.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन जिजा वाघ यांनी केले.कार्यक्रमासाठी डाॅ.डी.एम.जानराव, वाघमारे, आत्माराम लहाने, भगत, रक्षीतकुमार गायकवाड, सिध्दार्थ जानराव,मोहन गोरे,राजाराम मोरे,शाम सुंदर भगत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *