जालना/प्रतिनिधी महामानव,भारतरत्न, ज्ञानसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती भीम आर्मीच्या वतीने भिलपुरी-निरखेडा ( ता.जालना) येथे शासनाचे कोरोना नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक रंजित माने , भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, जिल्हा सल्लागार एम.यु.पठाण, भीम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष आर.बी.शिंदे पाटील, मौजपूरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बिराजदार, ए.के.पगारे यांच्यासह पाटील मोरे,परमेश्वर मोरे, अशोक पाडमुख आदिंची उपस्थिती होती.
यावेळी भिम आर्मीचे सिंम्बॉल असलेले 130 टी-शर्ट प्रदेश संघटक रंजित माने व जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रंजित माने यांनी जिल्हा स्तरावर डाँ. बाबासाहेब आंबेडकर-एक आदर्श महापुरूष या विषयावर निबंध स्पर्धा घेण्याबाबत सुचविले. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्पर्धा स्थगित करण्याचा विचार करण्यात आला. यावेळी भीम आर्मी पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply