ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ. ओ. पी. राऊत यांना अभिवादन

September 21, 202113:33 PM 64 0 0

जालना ( प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे संस्थापक सदस्य तथा नालंदा बुद्ध विहाराचे संचालक डॉ. ओ. पी. राऊत यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सोमवारी ( ता. २०) अभिवादन करण्यात आले. नागसेन वाचनालयात आयोजित सोहळ्यास रि. पा. इं. चे मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मगरे एमटीएनएल मुंबईच चे पी. सी. बनकर , ग्रंथालय विभागाचे विभागीय सहाय्यक संचालक हुसे,विभागीय अधीक्षक अनिल बाविस्कर, ग्रंथालयाचे संचालक राजेश राऊत, कॉ. सगीर अहेमद, संजय इंगळे, विनोद भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.


मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक चळवळीशी बांधीलकी जपत डॉ .ओ.पी. राऊत यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपला, तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने जीवनभर वाटचाल केली. नागसेन सार्वजनिक ग्रंथालय उभारणीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणारे डॉ ओ. पी. राऊत यांनी वाचनाचा व्यासंग शेवट पर्यंत जोपासला. त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
पूज्य भदंत धम्मधर शाक्यपुञ यांनी सामुहिक वंदना घेऊन मार्गदर्शन केले. राजेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रशांत राऊत, महेंद्र जोगदंड, गोरख खरात, प्रदीप फुलाने, राजेंद्र ठोंबरे, यशवंत राऊत, भिमशाहीर अनिल जाधव (मुंबई),धिरज वाघ एस. व्ही.काकडे, संगीता अंभोरे, अनिता खाडे, कमल भुतडा, सरिता जगताप, मथुराबाई साबळे, श्रीमती हिवाळे राहुल नगर महिला मंडळ, यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *