जालना (अनिता पवार) जि. प. प्रा. शाळा सोनगिरी. ता. जाफ्राबाद, जि.जालना येथील आदर्श शिक्षक रमेश सुरडकर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्षा सौ.दीपाली सुरडकर यांची सुकन्या डॉ.सायली सुरडकर हीने एम.डी.प्रवेश परीक्षेत 552 गुणासह देशात 8036 वा रँक घेऊन यश संपादित केले.
सायलीचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून आदर्श विद्यालय चिखली जिल्हा बुलडाणा येथे पार पडले. श्री शिवाजी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चिखली येथून 12 वी पास होऊन, M.I.M.E.R मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे, पुणे येथे M.B.B.S पूर्ण केलेल्या सायलीचे तसेच तिच्या आईबाबांचे अभिनंदन तसेच सायलीला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Leave a Reply