ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबिर

April 6, 202113:57 PM 4 0 0

नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीपर्व साजरे होणार असून येत्या १७ म एप्रिलपासून विशेष श्रामणेर शिबिरास प्रारंभ होणार आहे. हे शिबिर चैत्र पौर्णिमा २७ एप्रिल पर्यंत चालणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीपर्वानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे दहा दिवसांचे विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही कोरोनामुळे बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे इच्छुकांना श्रामणेर दीक्षा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे.‌ तसेच केंद्र व केंद्र परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पालन केले जाणार आहेत, असे धम्मसेवक गंगाधर ढवळे यांनी कळविले आहे.

नियोजित दहा दिवसाच्या या शिबिरात भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुभद्र, भंते सदानंद, भंते सुनंद, भंते शिलभद्र शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.‌ २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. श्रामणेर दीक्षा घेणाऱ्या इच्छुकांनी ८३०८८८७९८८ या भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने *ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्राचार्य साहेबराव इंगोले* यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *