जालना (प्रतिनिधी) आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, खंड मागायला गेलो तर ते मिळत नाहीत. ते उपलब्ध करुण दिले जात नाहीत. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले साहित्य उपलब्ध न होणे म्हणजेच या साहित्यावर, खंडावर अघोषीत बंदीच आहे, असा घनाघात भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केला. जालना येथे जिल्हा कमिटीच्या निवड सोहळ्या निमीत्त आयोजी एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य कमिटीचे दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, विलास पगारे, प्रकाश मगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रेमानंद मगरे, उपाध्यक्ष म्हणून माधुरी मोरे, राजेंद्र अंभोरे, महासचिव संजय हेरकर, सचिव अशा दवंडे, ससिचिव दिनकर गरड, संघटक भास्कर घेवंदे, सहसंघटक दत्तात्र्यय सरोदे, कोषाध्यक्ष राजकुमार दांडगे, संस्कार प्रमुख राहुल भदरगे, प्रवक्ता किरण सोणवने, प्रसिध्दी प्रमुख राजीव खरात, संपर्क प्रमुख सखाराम साबळे, विभाग प्रमुख नितीन निसर्गन, चंद्रमुनी गाडेकर यांची जिल्हा कार्यकारीणीवर निवड करण्यात आली.
यावेळी बोलतांना राजरत्न आंबेडकर म्हणारे की, पैसे देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, त्यांनी लिहीलेले खंड आम्ही मागतो आहोत, परंतु ते मिळत नाहीत, मुंबई, नागपुर, येथे स्वतंत्र ऑफीस आहेत, त्यामुळे आम्हाला आमचे साहित्य स्वतंत्र्यपणे प्रकाशित करण्यासाठी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी सुरु केलेली योजना त्यांच्या महापरिणीर्वानानंतर बंद पडली होती, ती आपल्याला पुन्हा सुरु करायची आहे. गावा गावात आपल्याला बौध्द महासभेचे पदाधीकारी, कार्यकर्ते तयार करायचे आहे, एखाद्या गावात एक जरी घर असले तरी त्याला तयार करायचे आहे. बौध्दांची जनगनना करुन भारत बौध्दमय करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. सरकार बौध्द धम्माच्या लोकांना चार भागात विभागत आहे, कुणी हिंदु, कुणी हिंदु महार, कुणी बौध्द, कुणी नव बौध्द अशा नोंदी केंद्र सरकार घेत आहे. 2011 साली झालेल्या जनगननेत बौध्दांची लोक संख्या 0.6 टक्के आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती, की, संपुर्ण भारत बौध्दमय करीन, आज या घोषणेला साठ ते सत्तर वर्ष झालीत, त्यासाठी आपण पुन्हा ताकदीने उभा रहायचे आहे. बौध्द लोकांना विभागून लोकसंख्या कमी करण्यासाठी भारत सरकारखुप मोठी बदमाशी करीत आहे. त्यामुळे आपण भारत सरकारच्या जनगननेवर अवलंबुन राहु नका, आपली जनगनना आपल्यालाच करावयाची आहे. असे आवाहन देखील राजरत्न आंबेडरक यांनी यावेळी केले.
Leave a Reply