ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

May 6, 202113:30 PM 39 0 0

मुंबई: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक आणि सामाजिक कार्य़कर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर बराच काळ पोलिसांना याप्रकरणात काहीही ठोस पुरावे मिळाले नव्हते. अखेर 25 मे 2019 रोजी पोलिसांनी विक्रम भावे याला अटक केली होती. सीबीआयने त्याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. तेव्हापासून विक्रम भावे तुरुंगात होता.
मात्र, आज उच्च न्यायालयाने विक्रम भावे याला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर विक्रम भावेला साधारण आठवडाभर पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावावी लागणार आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्याला आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल. तसेच विक्रम भावेला न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

दाभोलकरांच्या हत्येला सात वर्ष उलटूनही मारेकऱ्यांचा शोध नाही
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वा सात वाजण्यापूर्वी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचं यापूर्वी उघडकीस आलं होतं. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, असेही तपासात समोर आले होते.

दाभोलकरांच्या हत्येला 7 वर्षाचा कालावधी लोटला आहे. पाच वर्षानंतर या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. नालासोपारा स्फोटकप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *