ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

द्रोणागिरी हायस्कूल करंजा माजी विध्यार्थ्यां कडून गरीब गरजू मुलांना गणवेश वाटप

July 13, 202216:27 PM 19 0 0

उरण ( तृप्ती भोईर)  : ्दिनांक १२ जुलै २०२२ रोजी द्रोणागिरी हायस्कूल करंजा या विद्यालयाची माजी विद्यार्थी यांची एस एस सी.. १९८४/८५ बॅच यांच्या तर्फे काही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन श्री.सिताराम नाखवा, मुख्याध्यापक श्री एम.जी.म्हात्रे सर व माजी विद्यार्थी राजू धामणकर, देवयानी कोळी,नरेंद्र घोसाळकर, दिनेश कोळी उपस्थित होते.सदर प्रसंगी या बॅचच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देताना श्री.म्हात्रे एन.बी.सरांनी सांगितले की या बॅचने अगोदर सुद्धा विद्यालयास सिलिंग फॅन , प्रत्येक वर्गात डिजीटल व ब्लॅक बोर्ड व इतर साहित्य दिले आहे.आतापर्यंत या माजी विद्यार्थ्यांच्या अनेक बॅचेस या विद्यालयास मदत करत आहेत.माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी,करंजा सोसायटी हे नेहमीच मदतीला धावून येतात.या सर्वांचेच विद्यालय ऋणी आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *