ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नागरी समस्याबाबत द्रोणागिरी शिवसेनेतर्फे सिडकोला निवेदन

December 1, 202116:03 PM 50 0 0

उरण दि 30(राघवी ममताबादे ) : द्रोणागिरी शिवसेना शाखेच्या माध्यमातून उरण शहरात, द्रोणागिरी नोड परिसरात अनेक प्रश्न मार्गी लागले असून विविध समस्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी द्रोणागिरी शिवसेना शाखा नेहमी सिडकोकडे पाठपुरावा करत असते .उरण मध्ये अनेक समस्या असून त्यापैकी महत्वाचे समस्या म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कमतरता. हि कमतरता दूर करून नागरिकांना योग्य सेवा सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेच्या माध्यमातून उरण शहर व द्रोणागिरी शहरासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचे( एन एम एम टी) चे वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात याव्यात व एनएमएमटीच्या भविष्यकालीन नियोजन करता द्रोणागिरी सेक्टर 51 अ प्लॉट नंबर 6 येथे बस टर्मिनल(बस डेपो )साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी द्रोणागिरी शिवसेना शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

एनएमएमटीच्या बसेस उरण शहरात जातात परंतु तेथे टर्मिनलसाठी(बस डेपो साठी )सुरक्षित तसेच आरक्षित जागा नसल्यामुळे नागरिकांना खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे एन एम एम टी प्रशासनाला एसी बस उरण शहरात, द्रोणागिरी परिसरात सुरू करता येत नाही.टर्मिनल (बस डेपो )आणि चार्जिंग पॉईंट नसल्यानेहि अनेक प्रश्न उद्भवत आहेत.उरण शहर आणि परिसरात जेएनपीटी आणि द्रोणागिरी परिसरात अनेक विविध प्रकल्प, विकासकामे सुरु असल्याने जमिनीवर मातीचे भरावाचेही काम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे .आणि विविध प्रकारच्या इमारतीमुळे, इमारतीच्या कामांमुळे शहरातील तापमान अधिक वाढल्याने प्रवाशांचा धुळीपासून आणि गर्मी पासून बचाव करण्यासाठी शहरात वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. उरणमध्ये तसेच द्रोणागिरी शहरात वातानुकूलित बससेवा सुरू करावी, द्रोणागिरी सेक्टर 51 अ प्लॉट नंबर 6 येथे बस टर्मिनल(बस डेपो)बनविण्यात यावे अशी मागणी द्रोणागिरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *