ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मद्यधुंद ट्रक चालकाने ८ जणांना उडवले; ४ जण ठार

April 1, 202113:27 PM 113 0 0

मद्यधुंद ट्रक चालकाने आठ जणांना उडवल्याची घटना रेवदंडा रोहा मार्गावर घडली आहे. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एक जण अत्यवस्थ असून एकूण ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, आसपासच्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

…अखेर चांडगावनजीक हा ट्रक थांबला

रेवदंडा येथून हा ट्रक रोह्याच्या दिशेने वेगाने निघाला होता. साळाव आणि आमली येथे त्याने प्रत्येकी एका व्यक्तीला धडक देऊन जखमी केले. चेहेर येथे आणखीन दोघांना उडवले. या घटनेची माहिती मिळताच पुढील गावातील गावकऱ्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अडथळे उडवून ट्रक निघून गेला. ट्रक चालकाने न्हावे फाटा इथं एका दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यात दुचाकीवरून प्रवास करणारे शिक्षक लक्ष्मण ढेबे, त्यांची पत्नी रामेश्वरी ढेबे आणि मुलगा रोहित ढेबे हे तिघे ठार झाले. पुढे सारसोली इथं पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत उदय वाकडे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चौघांना ट्रकने धडक दिली. यात ते जखमी झाले. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जमावाला शांत करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *