जालना (प्रतिनिधी) ः वर्षानुवर्ष रुढी आणि परंपरेच्या चिखलात अडकून पडलेल्या बहुजनांना सन्मानाने जगता यावे यासाठी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी त्यांच्या काळात समता, न्याय, बंधुता आणि आरक्षण निर्माण केले. त्यांच्या या महान कार्यामुळेच आज सर्वच जाती धर्माचे आणि स्त्रिया सन्मानाने जिवन जगत आहेत असे प्रतिपादन सौ. ज्योतीताई भागवत राऊत यांनी केले.
मौजपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, महिला आणि बहुजनातील अनेक वर्ग असे होते की, ज्यांना त्यांच्या हक्काची आणि अधिकारी कधी जाणीवच निर्माण झाली नव्हती. परंतु राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी प्रत्येकाला सन्मान मिळावा यासाठी समता, न्याय आणि बंधुता प्रस्तापित करुन एक सुकर जगण्याचा मार्ग निर्माण करुन दिला. आज ज्या ज्या पदावर महिला आपले कार्य करत आहेत. पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून काम करीत आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत ते फक्त आणि फक्त राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्यामुळेच शक्य झाले असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार यांची तर प्रमुख पाहुने म्हणून जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना जयरंगे, उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, संतोष मोरे, सत्यनारायण ढोकळे, बद्रीनारायण भसांडे, बंडू काळे, विष्णू डोंगरे, राम जाधव, नारायण गायकवाड, रमेश राठोड, रमेश मगर, पांडूरंग जाधव, बंडूभाऊ डोंगरे, बालाजी बळप, भागवत राऊत, मनोहर मोरे, विष्णू डोंगरे, रामेश्वर गायकवाड, मुरली ढोकळे, जयराम डुच्चे, गणेश डोंगरे, अंकुश काळे, कृष्णा हिवाळे, निवृत्ती जाधव, बाळू गायकवाड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
Leave a Reply