ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भर दिवसाढवळ्या एका अज्ञात आरोपीने तरुणीचा केला विनयभंग

January 24, 202116:39 PM 21 0 0

देश आणि राज्य पातळीवर महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. पण असे असूनही, देशाच्या वेगवेगळया भागात आजही महिलांना काही पुरुषांच्या विकृत मानसिकतेचा सामना करावा लागतोय. अहमदाबादच्या नवरंगपुरा भागात शुक्रवारी दुपारी एका तरुणीला अशाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. पीडित तरुणी कायद्याची विद्यार्थिनी असून, भर दिवसाढवळ्या एका अज्ञात आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.

काय घडलं?
पीडित तरुणी कायद्याचे शिक्षण घेत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. शुक्रवारी दुपारी ती, ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने सामवेद रुग्णालयाजवळच्या एका कॉम्पलेक्समध्ये गेली होती. त्याचवेळी दुचाकीवरुन एक तरुण तिथे आला व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवले. आपल्याला संबंधित ठिकाण कुठे आहे, ते माहित नाही असे तरुणीने त्याला सांगितले. पण तरीही तो तिला सतत माहिती विचारत होता. अखेर ती त्याला मदत करण्याच्या हेतूने दिशा सांगू लागली. त्यावेळी अचानक त्याने तूला मासिक पाळी चालू आहे का? अशी विचारणा केली.

“त्यानंतर त्याने माझ्या शरीरावरुन अश्लील टिप्पणी केली. लगेचच त्याने त्याच्या पँटची चैन खाली खेचली व आपले गुप्तांग काढून दाखवलं. मी आरडाओरडा सुरु करताच त्याने तिथून पळ काढला” असे पीडित तरुणीने सांगितले.

“आपण जे करतोय, त्या बद्दल त्या तरुणाच्या डोळयात पश्चातापाची कुठलीही भावना नव्हती. पण मला सर्वात जास्त दु:ख झाले, ते लोकांच्या शांत असण्याचे. ही घटना घडली त्यावेळी पार्किंग लॉटमध्ये पाच जण होते. पण कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही” असे पीडित तरुणीने सांगितले. या घडलेल्या प्रकाराबद्दल तरुणीने महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *