ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे मर्दनगडावर दसरा साजरा

October 17, 202117:13 PM 48 0 0

उरण (संगिता पवार ): श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार व कार्याचा प्रसार, प्रचार करणाऱ्या, गड किल्ले यांचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जातात.त्याच अनुषंगाने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, उरण विभागा मार्फत सालाबाद प्रमाणे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गडपुजन व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.आवरे गावालगत असलेल्या ऐतिहासिक तटबंदी वर ज्या वास्तूला कील्याची डोंगरी (डोंगर) किंवा मर्दनगड म्हणून संबोधल जाते त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सकाळी १० वाजता आवरे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.उरण तालुक्यातील नवोदित शाहीर उमंग भोईर यांचा सुमधुर वाणीतून पोवड्याने वातावरण निर्मिती झाली. त्या नंतर तटबंदी वर गडपूजन व शस्त्र पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कौशिक ठाकूर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी उरण तालुक्यातील 25 शिवभक्त व आवरे गावातील ग्रामस्थ हजर होते. गड पूजनाच्या कार्यक्रमानंतर आवरे गावातील भोलेनाथ मंदिरात शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाहीर उमंग भोईर यांचा पोवड्यांचा कार्यक्रम झाला व कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमा दरम्यान सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत शाहीर उमंग भोईर व कौशिक ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सूत्रसंचालन संघटनेचे माजी अध्यक्ष नीलेश ठाकूर यांनी केले तर या ऐतिहासिक वास्तू बद्दल इतिहास अभिषेक ठाकूर व कौशिक ठाकूर सर यांनी उस्थितांना सांगितला व या वास्तूचे जतन, संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निश्चय केला गेला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *