उरण (संगिता पवार ) दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा …दसरा सणाला गोंडा ( झेंडू ) फुलास फारच मह्त्व असते .गोंडा फुलास मागणी वाढली असून उरण बाजार पेठेत नाक्या -नाक्यावर गोंडा फुलांच्या रासी लावण्यात आल्या होत्या .नागरिक फुले खरेदी करतांना सर्वत्र दिसत होते .गणपती चौक ,राजपाल नाका ,गांधी चौक ,बाजार पेठेत नागरिकांनी खूपच गर्दी केली होती.
फुले विक्रेते – प्रतिक्रिया
गोंडा फुलांत पिवळा ,व नारंगी फुलास मागणी खूप होती .राजपाल नाका येथे दर वर्षा प्रमाणे आम्ही गोंडा फुले विकत असतो .यंदा गोंडा फुले १०० रुपये किलो या दराणे विकली लहान आकाराच्या फुला पेक्षा मोठ्या आकाराच्या फुलांना नागरिक घेणे पसंत करतात असे फुल विक्रेते संजय म्हात्रे यांनी सांगितले .
फुल विक्रेते — प्रतिक्रिया
शेवंती फुले ३२० रुपये किलो .गोंडा फुले १६० रुपये किलो .वेणी २० ते ३० रुपये एकनग सकाळ पासूनच नागरिकांनी फुले खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती .सोनचाफा पुडी (१० नग ) ४० ते ५० रुपये ,अस्टर ,अश्या विविध रंगाची फुले नागरिक खरेदी करीत होते ,न्यू ,साई गणेश फ्लॉवर चे प्रकाश पाटील यांनी सांगितले
उरण बाजार पेठेत भाताच्या लोंब्या २० रुपये जुडी ,कोंबडा फुले जुडी
१० रुपये जुडी ,आपट्याची ( सोने ) पाने जुडी २० रुपये जुडी ,रेडीमेड तोरण २० ते ३० रुपये एक मीटर,गोंडा फुले हार ५० ते १०० रुपये या आंब्याची पाने जुडी १० रुपये या दराने विकल्या जात होत्या असे विक्रेत्याने सांगितले .
Leave a Reply