ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण यांच्या वतीने ई्-श्रम कार्ड वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

May 4, 202213:11 PM 32 0 0

उरण (तृप्ती भोईर) : आज आपण पहातो की, वाढदिवस साजरा करायचा म्हटला की मोठमोठे हॉटेल किंवा मौजमजेच्या ठिकाणाची निवड केली जाते आणि वाढदिवसाची मजा लुटली जाते परंतु सामाजिक बांधिलकीचा मनुष्यास विसर पडत आहे. परंतु हीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य व आपला वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेच्या अध्यक्षा रायगड भुषण सौ. संगिता ताई ढेरे यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप करून साजरा केला.
दि. ३ मे २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत, व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची झाडे व फुलझाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच याच ठिकाणी ई-श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वृक्षारोपण व ई-श्रम कार्ड वाटप या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष रायगड भूषण राजु दादा मुंबईकर, समाजसेवक अनिल घरत, कोटगावचे अध्यक्ष योगेश गोवारी, काळाधोंडा जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन नवनीत भोईर, जेष्ठ नागरिक शंकर भोईर, कोटगावचे पंच कमिटी सदस्य जितेंद्र भोईर, व इतर कोटगाव ग्रामस्थ, श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा सौ. संगिता ताई ढेरे, उपाध्यक्षा सौ.पुजा प्रसादे,सौ. वैदेही वैवडे, सौ.कविता म्हात्रे, सौ.सुप्रिया सरफरे, सौ.अभया म्हात्रे, सौ.सारीका भोईर, कु.महिमा म्हात्रे अष्टभुजा हिरकणी व बाळकडू पेपरच्या पत्रकार सौ. तृप्ती भोईर, शाम भोईर,कु.साहिल प्रसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांना एक एक वृक्ष देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. केअर ऑफ नेचर चे अध्यक्ष राजु दादा मुंबईकर यांनी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण या संस्थेसाठी ई-श्रम कार्ड मोफत उपलब्ध करून दिले. तसेच राजु दादा मुंबईकर यांनी व समाजसेवक अनिल घरत यांनी सौ.संगिता ताई ढेरे यांच्या हातुन वेळोवेळी होणाऱ्या समाजकार्यातील योगदानाचा इथे विशेष उल्लेख केला. जमलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते शोभेची व फुलझाडे लावण्यात आली. तसेच या लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी कोटगाव ग्रामस्थांनी घेतली आहे. श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था उरण च्या अध्यक्षा सौ. संगिता ताई ढेरे व त्यांच्या सहकारी टिमचे कोटगाव ग्रामस्थांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *