नांदेड (रुचिरताई बेटकर) हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत रविवारी (दि.११) सकाळी ८.३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूगर्भात झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे चित्र होते.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. ल. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल अशी मोजली गेल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागाने दिली. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात रविवार, १९ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान जमीन हलली आणि काही सेकंद धक्के बसले. लगेच सोशल मीडियावरून अनेकांनी ही माहिती शेअर केली.
त्यानंतर दहा मिनिटांतच पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. दोनदा बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नांदेडकर अस्वस्थ झाले. शहरातील बळीरामपूर, गुरुद्वारा, वजिराबाद हनुमान पेठ, शिवाजीनगर, श्रीनगर, काबरानगर, पूर्णा रोड, चैतन्यनगर, तरोडा आदी भागांत हे धक्के जाणवले.
मात्र नांदेडच्या जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत नांदेड शहर व अर्धापूर भागाला बसलेल्या भूकंपाच्या धक्याबाबत काहीच स्पष्ट केले नव्हते.
त्यामुळे भीती कायम होती. नांदेड पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, पार्डी (म), कामठा, शेलगाव, वाहेदपूरवाडी, गणपूर, कोंढा, मालेगाव, उमरी, आदी भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून भूगर्भात मोठे आवाज होण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषतः वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यांतील काही गावांमधून हा आवाज जाणवत आहे. मात्र भूगर्भातील पोकळीमध्ये पाणी शिरल्याने हा आवाज होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
४.४ रिश्टर स्केलचा भूकंप
यासंदर्भात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे सांगितले.
तोच भूकंप हिंगोली जिल्ह्यात जाणवला का, याची माहिती घेतली जात आहे. तर प्रशासनाने सदर भूकंपाचे केंद्रबिंदू यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे असल्याचे सांगितले. दहा किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Leave a Reply