ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उल्हासनगर शाळेच्या बाल हिरकणीने बनवला इकोफ्रेंडली गणपती

September 15, 202113:35 PM 47 0 1

सातारा(विदया निकाळजे ) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी हद्दीतील उल्हासनगर ही जिल्हा परिषदेची शाळा विविध उपक्रम राबविण्यात प्रसिध्द आहे. शाळेतील शिक्षक सौ. अमिना इक्बाल मुलाणी व श्रीम. वैशाली दत्तात्रय खाडे दोन्ही विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे प्रशिक्षण देत असतात.


याच शाळेतील अमृता दशरथ खाडे व समृद्धी दशरथ खाडे या दोन चिमुकल्या हिरकण्या,कोरोनाच्या कहरामुळे यंदाच्या वर्षी गणपती बसविण्या साठी पैसे नसल्यामुळे हिरमुसल्या होत्या.ऑनलाईन क्लास च्या निमित्ताने वर्ग शिक्षिका अमिना इक्बाल मुलाणी यांनी फोन केला असता समृद्धी गणपती आणण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रडत होती.तिची खंत तिची छोटी बहीण अमृता हिने मुलाणी मॅडम यांना सांगितली. मुलाणी मॅडम यांनी तिची समजूत काढली व घरच्या घरीच इकोफ्रेंडली गणपती निर्मितीचे धडे ऑनलाइन पद्धतीने दिले.
आणि बघता बघता इकोफ्रेंडली गणरायाची सुबक मूर्ती निर्माण झाली.हिरमुसली झालेली समृद्धी खुदकन हसली आणि तिनेच बनविलेले गणराज त्यांच्या घरात विराजमान झाले.अशा पद्धतीने उल्हासनगर शाळेच्या समृद्धी आणि अमृताने इकोफ्रेंडली गणपती तयार केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *