ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षण विभाग नगरपरिषद मुरुड जंजिरा रायगड सौ अमिता भगत मुख्याध्यापिका यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

November 28, 202116:40 PM 47 0 0

मुरुड जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) :  मुरुड जंजिरा नगरपरिषद शाळेतील मुख्याध्यापिका सौ अमिता अविनाश भगत यांचा सेवापूर्ती सोहळा माननीय प्रशासनअधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रथम निधन झालेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व्यासपीठावरील मा. प्रशासनाधिकारी तथा कार्यक्रम अध्यक्षा दिपाली दिवेकर मॅडम,माजी केंद्रप्रमुख अनंत आगलावे,सेवानिवृत्त जेष्ठ मुख्याध्यापिका सौ वैशाली कासार,अविनाश भगत यांचे केंद्रप्रमुख व शिक्षक संघटना अध्यक्षा अनघा चौलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थितांचे स्वागत आरती थोरवे,मुख्याध्यापक राजेश भोईर यांनी गुलाबपुष्पे देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालिका सौ सायली गुंजाळ यांनी सेवापूर्ती सौ अमिता अविनाश भगत मुख्याध्यापिका यांचा जन्म सेवेत लागल्याची तारीख ३६ वर्षाच्या कालावधीत काम केलेल्या शाळा , मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्याची तारीख व कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा कार्यक्रम उशीरा घेतल्याचे नमूद केले.

मा प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांनी पुस्तक प्रदान केले. नगरपरिषद शिक्षकांनी श्रीफळ भेट वस्तू, व पुष्पगुच्छ केंद्रप्रमुख अनघा चौलकर यांच्या हस्ते सन्मानित केले.राकेश कौलकर,यांनी भेटवस्तू देऊन सत्कारमूर्ती सौ अमिता भगत बाईंचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त शिक्षकांनी श्रीफळ,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सेवानिवृत्त शिक्षिका सौ नीलांबरी भगत यांनी सेवानिवृत्त वरीष्ठ कर्मचारी उषा दांडेकर यांनी पाठविलेली भेटवस्तू देऊन शुभेच्छा पत्राचे वाचन केले. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ सुजाता जंजिरकर,सेवानिवृत मुख्याध्यापक नारायण नांदगावकर चंद्रकांत मसाल,वसंत दळवी,फईम मॅडम, सौ मंगल वाडकर,बालवाडी शिक्षिका,उपस्थित होत्या. सेवापूर्ती सौ अमिता भगत यांच्या विषयी मनोगतात माजी केंद्रप्रमुख अनंत आगलावे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ नैनिता कर्णिक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ उषा खोत मुख्याध्यापक राजेश भोईर मुख्याध्यापिका,सौ आरती थोरवे ,महेंद्र हावरे या सर्वांनी आपल्या मनोगतात भगत बाईंचा प्रेमळ स्वभाव,विद्यार्थ्यांना अतिशय चांगले ज्ञानाचे धडे दिले.आपला विद्यार्थ्यांना आयुष्यात चांगले
घडविण्यासाठी असलेली धडपड शाळेत केलेले बदल,प्रत्येकाविषयी असणारे प्रेम,विणकाम,भरतकाम झाडांविषयीची आवड, सुंदर हस्ताक्षर ,कर्तव्यनिष्ठ,हळवा स्वभाव व भगत बाईंचे मिळालेले सहकार्य अशा सर्व आठवणींना उजाळा. दिला.पती अविनाश भगत यांनी आपल्या आपल्या पत्नीनी कठीण काळातही मोठा धीर दाखवून दिलेली साथ आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. सत्कारमूर्तीअमिता भगत यांनी आपल्या मनोगतात मुख्याध्या पक सहकारी शिक्षक यांनी नोकरीत दिलेली साथ, आईची इच्छा होती की,मी शिकावे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती परंतु माझ्या बहिणीची आर्थिक परिस्थिती नसताना शिकविले त्या मुळेच मी या खुर्चीत बसू शकले मी माझ्या दोन बहिणींना विसरू शकत नाही.असे प्रतिपादन केले. व मला सासरच्या लोकांची ही चांगली साथ मिळाली हे नमुद केले. व सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही.निरोप घेतला म्हणून नाते तुटत नाही या वाक्या तूनच आपल्या सर्व भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीयभाषणात मा. प्रशासनाधिकारी दिपाली दिवेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची उत्तम पद्धत, शाळा ताब्यात घेण्यासाठी केलेले प्रयत्न या विषयी कौतुक केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश ठाकुर, सौ संध्या नागे , सौ राजश्री गझने सौ कल्पना पेणकर ,भरत शिंदे, बालवाडी शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले. केंद्रप्रमुख अनघा चौलकर यांनी अमिता भगत व मी एकाच वेळी नोकरीला लागलो व भगत बाईंनी जे विणकाम मुलींना शिकविले त्याचा उपयोग त्या मुलीने आपल्या उपजीविकेसाठी करत असल्याचे नमुद करून सर्व उपस्थि त्यांचे मन:पूर्वक आभार मानून अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *