ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे महाद्वार – प्रा. सुभाष क्षीरसागर

August 5, 202212:18 PM 16 0 0

नांदेड – शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माणूस सतत काही ना काही शिकत असतो आणि आपली प्रगती करून घेत असतो. आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा पाया हे शिक्षण असून मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण आवश्यक असून ते सर्वांगीण प्रगतीचे महाद्वार आहे असे मत प्रा. सुभाष क्षीरसागर यांनी व्यक्त केले. ते महाविहार परिवाराच्या वतीने अभ्यासवर्गाचे सहावे पुष्प गुंफत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी निवृत्त कार्यकारी अभियंता एस. टी. पंडित यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता भीमराव हटकर, रमेश दुधमल, सिद्धार्थ पाटील यांच्यासह भंते शिलरत्न, हिरामण वाघमारे, अशोक गोडबोले, डी. डी. भालेराव, भरत कानिंदे, प्रज्ञाधर ढवळे, यशवंत गच्चे, साहेबराव पुंडगे, रमेश कोकरे आदींची उपस्थिती होती.

येथील महाविहार परिवाराच्या वतीने दरमहा अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. आत्तापर्यंत यात सुरेश गायकवाड, रमेश सोनाळे, दिगांबर मोरे, विजय गोणारकर, नितीश नवसागरे यांनी सहभाग घेतला होता. जुलै महिन्याच्या अभ्यास वर्गात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार ‘ या विषयावर प्रा. क्षीरसागर मार्गदर्शन करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण राबविताना सरकारला आधुनिक मनुवाद लादायचा आहे. धर्माच्या, संस्कृतीच्या परंपरा, जातनिहाय असलेले कौशल्य शिक्षण, व्यवस्थेतील सनातन संरचना आणि वर्गवाद यांच्या आधारावर नव्या भारताचे नवे शैक्षणिक धोरण आणायचे आहे. समाज पाच वर्णव्यवस्थेत विभागणारे हे धोरण आहे. याला कडाडून विरोध झाला पाहिजे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे आणि संविधान प्रास्ताविकेचे पुष्प, दीप, धूप पूजन करण्यात आले. तत्पूर्वी सहयोग नगरस्थित माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिला मंडळाच्या वतीने याचना घेण्यात आल्यानंतर भंते शिलरत्न यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. दरम्यान भीमराव हटकर, रमेश दुधमल, सिद्धार्थ पाटील यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. अभ्यास वर्गाचे सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भरत कानिंदे यांनी करून दिला. प्रास्ताविक अशोक गोडबोले यांनी तर आभार रमेश कोकरे यांनी् मानले भंतेजींच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *