ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पालकमंत्र्यांच्या मदतीने खुरगाव तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी प्रयत्नशील – बापुराव गजभारे

March 4, 202114:46 PM 126 0 0

नांदेड – श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बौद्ध संस्कृती रुजविण्याला चालना मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. चोवीस तास अष्टोप्रहर चालणारे हे भारतातील एकमेव श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मदतीने हे केंद्र तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे प्रतिपादन येथील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा मनपाचे नगरसेवक बापुराव गजभारे यांनी तालुक्यातील खुरगाव येथे केले. यावेळी जिल्हा परिषदेचे शालेय शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवतकर, समाज कल्याण निरीक्षक डी. आर. दवणे, स्वारातीम विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जे. एन. चव्हाण, जिल्हा नियोजन व विकास समितीचे उपेंद्र तायडे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. एन.के. सरोदे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सल्लागार तथा प्राचार्या डॉ. संघमित्रा गायकवाड, धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव नांदुसा येथे दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत विशेष श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.‌ त्यात २६ उपासकांना दीक्षा देण्यात आली होती. त्याचा सांगता समारंभ माघ पौर्णिमेनिमित्त ‘पौर्णिमोत्सव’या नावाने घेण्यात आला.

सोहळ्याच्या प्रारंभी मंचावर भिक्खू संघाचे आगमन झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पवंदन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. धम्मसंदेश पथकाचे अंबादास कांबळे, राम कांबळे, इश्वर जोंधळे यांनी याचना केल्यानंतर भदंत पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थित उपासकांना त्रीसरण पंचशील दिले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भंते संघरत्न यांची धम्मदेसना झाली. त्यानंतर श्रामणेर दीक्षितांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी श्रामणेर प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. विदिशा महिला मंडळाच्या वतीने कमलताई सरोदे, जिजाबाई झिंझाडे, पद्मीनबाई धुळे, सुजाता शिरसे, पांडूरंग वाकळे, प्रबुद्ध चित्ते यांनी भोजनदान केले. सुभाष लोकडे व भीमगीत गायन संचाच्या वतीने गीत गायन व प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. आशिर्वाद गाथेनंतर सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रणजीत गोणारकर यांनी तर आभार शंकर नरवाडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ पाटील, सूर्यकांत गोणारकर, संदीप सोनकांबळे, प्रक्षीत सवनेकर, नागापूरचे सरपंच दत्ता व्यवहारे, चांगुणा गोणारकर, गयाताई कोकरे, दीपक अंभोरे, मारोती मोहिते, सुरेश मगरे, भैय्यासाहेब गोडबोले, एकनाथ कार्लेकर, राणी भगत, अतुल भवरे, सुभेदार के. बी. सावंत, मेत्य चित्ते यांच्यासह माता गौतमी महिला मंडळ जनता काॅलनी, रमाई महिला मंडळ आंबेडकर नगर, मोत्याचा धानोरा महिला मंडळ, यशोधरा महिला मंडळ व‌ पंचशील बुद्ध विहार समिती चुडावा, गायतोंड येथील उपासक उपासिका, सुमेध कला मंच व रामजी सकपाळ ज्येष्ठ नागरिक संघ आंबेडकर नगर यांच्यासह परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी उमाजी नरवाडे, रवी नरवाडे, राहूल नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, अनिता नरवाडे यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *