ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देगाव चाळीत सामाजिक न्याय दिनानिमित्त ‘एक वही -एक पेन’ अभियान

June 25, 202113:22 PM 10 0 0

नांदेड – शहरातील देगावचाळस्थित प्रज्ञा करुणा विहार येथे आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देगाव चाळ व परिसरात राहणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या दोनशे विद्यार्थ्यांना एक वही एक पेन वाटप करून हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुकुंद खाडे या भारतीय लष्करातील सैनिकाच्या पुढाकारातून सकाळी अकरा वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर लगेच वही पेन वाटपाच्या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

जागतिक बौद्ध परिषद बॅंकाॅक थायलंडचे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार समिती देगांवचाळ नांदेडच्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शनिवार दिनांक २६ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रज्ञा करुणा विहार येथे साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रिपाइं सदस्य तथा मनपाचे सेवानिवृत्त उपआयुक्त श्री प्रकाश येवले हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून वजिराबाद पोलिस स्टेशन नांदेडचे पोलिस निरीक्षक जगदिश भंडरवार आणि पोलिस उपनिरीक्षक जी. बी. जाधव हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोविंद केंके, राहुल कोकरे तुप्पेकर, साहित्यिक गंगाधर ढवळे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष आयु. दिपक सातोरे, अॅड आकाश खाडे, शिक्षिका अनिताताई संजय नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते श्री अब्दुल नईम अब्दुल सलिम, संयोजक सुभाष लोखंडे आणि भारतीय सैन्यदलातील सैनिक राष्ट्रपाल खाडे हे प्रमुख अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय लष्करातील सैनिक मुकुंद खाडे यांच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण २०० विद्यार्थ्यांना ‘एक वही – एक पेन’ चे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देगावचाळीतील दोन विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर भाषण करणार आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी प्रज्ञा करुणा विहार येथे सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या या सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क लावूनच हजर रहावे अशी विनंती संयोजक सुभाष लोखंडे प्रज्ञा करुणा विहार समिती यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *