ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अलिगढमध्ये जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

March 1, 202114:43 PM 45 0 0

लखनऊ : अलिगढच्या एका गावात जनावरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मृतदेह जंगलात मिळाल्याने एकच खळबळ माजली. ही घटना अकराबाद ठाण्याअंतर्गत एका गावात घडली आहे. येथे 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी दुपारी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी जंगलात गेली होती. मात्र, उशिरापर्यंत जेव्हा मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे तिचं कुटुंब चिंतेत पडलं. गावकऱ्यांसोबत या मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही सापडली नाही.

काही वेळानंतर मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आली. कुटुंबाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. एसएसपी मुनिराज यांनी सांगतिलं की, पोलिसांना माहिती मिळाली होती की अलिगढमध्ये अकराबाद परिसरातील किवलास गावात एका मुलीचा मृतदेह शेतात मिळाली आहे. मुलगी सकाळी 10 वाजता आपल्या घरातून निघाली होतीपण सायंकाळी 4 वाजेपर्यंत ती परत आली नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला.

जंगलात मृतदेह मिळाल्याने गावात खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या संपूर्ण टीम घटनास्थळावर पोहोचली. घटनेच्या तपासासाठी पाच टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकेल. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

जनावरांसाठी चारा घेण्यासाठी गेली ती परतलीच नाही
पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलगी चारा घेण्यासाठी शेतात गेली होती. पण, बराच वेळ ती घरी परतली नाही. ती अलिगढमध्ये आजीकडे राहत होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *