ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण तालुका कार्याध्यक्ष पदी अंकुश पाटील शिखरे यांची निवड

August 22, 202213:05 PM 13 0 0

नांदेड – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ सुर्यवंशी यांनी अंकुश पाटील शिखरे यांची नांदेड दक्षिण तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केली. अंकुश पाटील शिखरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ‌जेष्ठ नेते अंबादासराव देशमुख, युवा नेते दिलीप ‌धोंडगे, शिवराज पाटील धोंडगे, संजय मोरे ‌सोनखेडकर, दत्ता पाटील दगडगावकर, स्वप्निल भाऊ इंगळे, संतोष दगडगावकर , लक्ष्मण फुलझळके व पक्षातील अनेक मान्यवर व सहकारी मित्रांनी शुभेच्छा दिल्या.


आतापर्यंत पक्षातील विविध पदावर अंकुश पाटील यांनी विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष , ग्रंथालय तालुकाध्यक्ष व पक्षातील विविध चळवळीत सक्रिय सहभागी होऊन पक्ष बळकटीसह ‌समाज उपयोगी कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी शिखरे यांची तालुकाध्यक्ष पदी एका छोटेखानी कार्यक्रमात निवड केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अंबादास जोगदंड, संदिप क्षीरसागर, प्रा.शिवराज पवार, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड दक्षिण उपाध्यक्ष ज्ञानोबा शिखरे, युवक काँग्रेस नांदेड उत्तर तालुकाध्यक्ष कैलास कदम, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्ते उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *