ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या जालना तालुका उपाध्यक्षपदी शामद खा पठाण यांची निवड

February 26, 202213:55 PM 30 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या जालना तालुका उपाध्यक्षपदी वडीवाडी येथील शामद खा पठाण यांची निवड जालना तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष डॉ. सय्यद यांनी निवड केली. नियुक्ती प्रमाणपत्र देतांना राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष डॉ. सय्यद आदींनी दिले आहे. यासंदर्भात देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या जालना तालुका उपाध्यक्षपदी शामद खा पठाण यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण आणि राष्ट्रीय नेते तथा संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची वैचारिक भूमिका लक्षात घेऊन त्याच्या प्रचार व प्रसारासाठी आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या भागामध्ये पक्ष संघटन वाढविण्यासाठी कटीबध्द व्हावे. तसेच आपल्या विचारांची नव्या जुन्या पिढीतील तसेच सर्व समाज घटकातील अधिकाधिक माणसे जोडावित. सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन सकारात्मक निवडणूक रणनिती आखावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी काम करावे. जनहिताच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमाचे आपल्या पातळीवर नियोजन करून ते सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवावेत व त्यासंबंधीचा अहवाल वेळोवेळी जिल्हा राष्ट्रवादी कमिटीकडे पाठविण्याची व्यवस्था करावी.
या निवडीबद्दल दिलीपराव भुतेकर, भगवानराव डोंगरे, गणेश कदम, सोपान पाडमुख, भगवानराव घाटुळ, अशोकराव देशमुख, आंबादास शिंदे, रमेश जोशी, हकीम पठाण, राजाभाऊ उजड, भगवानराव नाईकनवरे, रामदास म्हस्के, पांडुरंग उबाळे, तात्यासाहेब सराटे, मुसा शेख, मुक्तीराम सराटे, हनुमंत इंगळे, शिवाजीराव खेडेकर, धनंजय मोहीते, संदीप देशमुख, अनिस पठाण, महादेव खांडेभराड, मुक्तीराव शिंगाडे, रंगनाथ नांगरे, रमेश शिंदे, कैलास वाहुळकर, आक्रम पठाण, विनोद देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *