सातारा, (विदया निकाळजे यांचेकडून) घरगुती वापराच्या गॅससह, पेट्रोल – डिझेलचे वाढलेले दर त्वरित कमी करुन केंद्र शासनाने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात दिला आहे घरगुती गॅस पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता हैरान झाले आहे.
वारंवार होणाऱ्या लॉक डाऊन मुळे जनतेच्या हाताला काम नाही त्यातच गॅस सिलिंडरचे वाढलेले भरमसाठ दर यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे .कोरोना महामारीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोसळले आहे ,तसेच दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तूंचे दर वेळोवेळी वाढवण्यात येत असल्यामुळे आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे सध्याच्या कोरोनाच्या काळात बहुसंख्य नागरिकांना नोकरी रोजगार गमावला असून उद्योगधंदे बंद पडले आहेत अशा परिस्थितीत केंद्र शासनाकडून घरगुती गॅस पेट्रोल डिझेलच्या दरात वारंवार वाढ केली जात आहे गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक इंधनासाठी पुन्हा वृक्षतोडीकडे वळले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घरगुती वापराच्या गॅस सह पेट्रोल डिझेलचे दर त्वरित कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनाची प्रत पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनाही पाठवली आहे.
Leave a Reply