जालना (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील रेवगाव येथे प्रधानमंत्री कौशल्य केंद्र जालना येथील पदाधिकार्यांनी किरण सेशनच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी व जनतेच्या मनामध्ये कोव्हिड-19 ची भीती न राहता आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करायचे व कोणती काळजी घ्यायची याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम प्रधानमंत्री कौशल्य केंद्र जालनाचे केंद्रप्रमुख योगेश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सर्व ट्रेनर आणि मोबालाइजर यांनी विशेष परिश्रम घेतले. एम्पावर प्रगतीचे स्टेटहेड प्रताप श्रीनिवासन, डायरेक्टर के. बी. राजेंद्रन, प्रित्ता दत्ता आदींसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Leave a Reply