ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराजा अग्रसेन जयंती महोत्सवनिमित्त अग्रवाल युवा मंचतर्फे आयोजित स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

September 28, 202115:01 PM 7 0 0

जालना/प्रतिनिधी महाराजा अग्रसेन जयंती महोत्सव निमित्त जालना शहरात अग्रवाल युवा मंचच्या वतीने विविध स्पर्धा 26 सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत अग्रवाल समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला.


यावेळी अध्यक्ष अंकीत अग्रवाल, सचिव करण अग्रवाल, कोषाध्यक्ष पुरूषोत्तम फत्तेपुरीया, उपाध्यक्ष नितीन अग्रवाल, प्र. सचिव मोहित गोयंका, सहसचिव आकाश गिंदोडीया, जनसंपर्क राहूल मित्तल आदिंची उपस्थिती होती.
यावेळी सदस्य दिपक गेवराईवाला, आकाश तालुका, गोपाल अग्रवाल, गोपाल पंच, अनुज पंच, परेश गजबी, अंकुश अग्रवाल, अल्केश अग्रवाल, यश अग्रवाल, देवराज कामड, हर्ष भरतीया, यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.यावेळी 200 मिटर धावणे, 500 मिटर धावणे, स्लो सायकलिंग, थैला रेस, लिंबु चमचा, भाला फेक, पोहणे, स्केटींग, संगीत खुर्ची, स्मरण शक्ती व 1 मिनीट गेम या स्पर्धा पार पडल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *