ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पर्यावरण पुरक होळी साजरी करावी

March 17, 202212:49 PM 119 0 0

होळी म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा सण. ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे होळीचा फाल्गुन महिना मराठी माणसासाठी शेवटचा महिना आहे.नवीन वर्षांची सुरुवात चैत्र महिन्यापासुन होते म्हणजेच “गुडी पाडवा”. त्यामुळे जुने वर्ष होळी व धुलीवंदनाच्या रूपात साजरे करून जुन्या वर्षाला निरोप दिला जातो.आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.बदलत्या काळानुसार होळी व धुलीवंदन साजरे करतांना पर्यावरण व निसर्गाचे संतुलन जोपासने अत्यंत गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने कोणत्याही धर्माचे सण असो त्यांनी सुध्दा निसर्गाला कुठेही इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.सध्याच्या परिस्थितीत वाढते प्रदूषण सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे.त्यामुळे होळी हा सण साजरा करतांना पर्यावरणाशी निगडित असावा.कारण होळी या सणाला लाकुड,पाणी यांचा वापर जास्त होतो आणि या दोन्ही गोष्टी पर्यावरणाशी अत्यंत निगडित आहे.मागील दोन वर्षापासून संपूर्ण धर्माच्या सणांना करोना महामारीचे ग्रहण लागले होते.परंतु आता करोना महामारी हळूहळू निवळत आहे.तरीही सर्वांनीच सावध रहाने गरजेचे आहे.होळीला दरवर्षी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो.त्यामुळे होळी या सणाला पाण्याचा वापर टाळावा व पर्यावरणातील वाढते प्रदूषण पहाता स्वच्छतेकडे सर्वांनीच जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे.देशात आणि जगात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढणार आहे.त्यामुळे होळीच्या सणाला पाण्याचा वापर टाळावा व पाणी वाचवीण्याचा संकल्प सर्वांनीच करावा.उष्णतेचे वादळ आणि पाण्याच्या हा!हा!कार यामुळे मानव व पशुपक्षी नेहमीच भरडत असतो.वाढती लोकसंख्या यामुळे मानवाने भुभाग पुर्णतः काबीज केल्याचे दिसून येते.देशात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.होळीच्या दीवशी गुलाल, रंग,वारीस इत्यादीसह केमिकल युक्त रंगाचा वापर होतांना आपण पहात असतो.यामुळे डोळ्यांना व चेहऱ्याला इजा होऊ शकते यापासून सावध राहण्याची गरज आहे.रंग खेळताना कोणीही हा विचार करत नाही की पाण्याचा व्यत्यय कीती होतो.होळी या सनाला दरवर्षी “लाखो लिटर”पाणी वाया जात असते आणि पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.आजही महाराष्ट्रात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतांना दीसते व याचा परिणाम शेतकऱ्यांना जास्त भोगावा लागतो.आजच्या परीस्थितीत हवामान खाते सांगत आहे की यावर्षी उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त तापणार आहे.त्याचप्रमाणे २०२३ मध्ये उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.यावरून आपण समजू शकतो की पाण्याची समस्या कमी न होता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.त्यामुळे आज पाण्याचा “एक एक थेंब” वाचवीण्याकरीता मानवाने चुरशीचे प्रयत्न केले पाहिजे.होळीचा सन हा पाच दिवस म्हणजेच पंचमी पर्यंत चालतो त्यामुळे या काळात पाण्याचा वापर जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्याचप्रमाणे देशात जंगल तोडीमुळे लाकडांची कमतरता पहाता होळी दहणाकरीता कमीत कमी लाकडांचा उपयोग केला पाहिजे.देशात आणि जगात पाण्याची समस्या व “कोरोणा महामारीचा” प्रकोप पहाता फक्त देशी गुलाल किंवा फुलांचा वापर करून होळी या महत्त्वपूर्ण सनाचा आनंद घ्यावा.पाण्याची वाढती समस्या पहाता व करोणा महामारी पहाता नागरिकांनी पाणी वाचविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.यावर्षी सुध्दा “धुलीवंदन” हा सण साजरा करतांना करोना नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. यावरून सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे की धुलीवंदन “शार्ट बट स्विट” मध्ये खेळले पाहिजे.”बुरा न मानो होली हैं”म्हणत आपण दरवर्षी होळीचे “सेलिब्रेशन”करीत असतो.त्यामुळे आता “बुरा न मानो सावध रहके होली खेलो”असे म्हणन्याची वेळ आली आहे.आज पाण्याच्या भरोशावरच मनुष्य,प्राणी,अन्न-धान्य, जंगल हे सर्व पाण्यावरच अवलंबून असते पाणी हे “सोन”समजा आणि होळीला फक्त “गुलाल” किंवा फुलांचा वापर करून होळीचा सण साजरा करावा.ज्या प्रमाणे मानवाला “अन्न,वस्त्र, निवारा”या गोष्टीची गरज आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण जिवसृष्टीला पृथ्वीला “पाण्याची”गरज आहे.जंगल तोडीमुळे निसर्गाचे संतुलन “विस्कळीत” झाले आहे.त्यामुळे आज हिंसक पशु (वाघ, बिबट्या,अस्वल) इत्यादी अनेक प्राणी जंगलातून गावात व शहरात शीरकाव करतांना दिसते.कारण मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगल संपदेवर अतीक्रमन केल्याचे दिसून येते.त्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत नसुन आपण जंगलाकडे आगेकूच करीत आहो.त्यामुळे होळी करीता कमीत कमी लाकडांचा वापर केला पाहिजे. आता वाढत्या कारखान्यांमुळे आणि परमाणु परीक्षण,शस्त्रस्पर्धा यामुळे प्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.त्याचप्रणाणे रशिया -युक्रेन युद्धाचे सावट तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करताना दिसत आहे.त्यामुळे सावधान. कॅन्सर,डेंगु,साईनफ्यु इत्यादी सह अनेक रोगांचा शिरकाव प्रदूषणामुळे होतांना दिसतो.त्यामुळे होळीला पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे.भारतासह संपूर्ण जगभर २२ मार्चला “जागतीक जल दीन”पाळला जातो याची कृती होळीच्या सणाला करावी व पाणी वाचवावे.कारण पाणी हे निसर्गाचे “अनमोल रत्न”आहे.त्याला वाचवीण्याचा प्रयत्न सर्वांनीच सर्व स्तरातून केला पाहिजे.इतर देशांप्रमाणे भारतसुध्दा पाण्याच्या बाबतीत “रेडलाईट झोनमध्ये”आहे.त्यामुळे भारतसुध्दा पाणी टंचाईच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.त्यामुळे होळीचे औचित्य साधून प्रत्येकांनी आपल्या परीसरात एक-एक झाड लावुन निसर्गाला पुनरूज्जीवीत केले पाहिजे व सर्वांनीच पाणी वाचविण्याचा संकल्प केला पाहिजे.यातच खऱ्याअर्थाने धुलीवंदन दीसुन येईल.त्यामुळे “जान है तो जहान है” हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारून पुढचे पाऊल टाकायला पाहिजे.गेल्या दोन वर्षांत करोना महामारीने मानवजातीला बरेच काही शिकवीले.त्याचे अनुकरण करून प्रत्येकांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी स्वतःच घेतली पाहिजे.यामुळे सर्वांचेच जीवन सुरक्षित रहाण्यास मोठी मदत मिळेल.कारण आपण सुरक्षित तर निसर्ग सुरक्षित, निसर्ग सुरक्षित तर संपूर्ण जीवसृष्टी सुरक्षित, संपूर्ण जीव सृष्टी सुरक्षित तर जग सुरक्षित.यासाठी होळीच्या महत्वपूर्ण सणाचे औचित्य साधून प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावलेच पाहिजे.यामुळे एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल व पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल. . लेखक. .
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779,नागपूर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *