ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अतिवृष्टी भागांमध्ये जीवनावश्यक साहित्याची मदत

September 9, 202122:17 PM 15 0 0

अंबड प्रतिनिधी (वैशाली फोके) : जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरे पडली आहेत. घरात होत नव्हतं साहित्य पाणी आणि चिखलाखाली आलं त्यामुळे अनेक कुटूंब रस्त्यावर आली आहेत. आम्ही आमच्या परीने अशा कुटूंबाना भेटून त्यांना शक्य ती मदत करत आहोत. आज अशा कुटूंबाना 10000 तर काही ठिकाणी 5000 रुपयांची नगदी मदत आम्ही केली असून त्यांना तात्काळ लागणारी जीवनावश्यक साहित्याची मदतही आम्ही करत आहोत.


आज घनसावंगी, अंबड तालुक्यातील अनेक शेतकरी शेतमजुरांना तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. अनेक गावामध्ये आजही पोहचता आलेलं नाही. जिथे जशी शक्य होईल तशी मदत पोहचवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत.
आजवर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आम्ही पूर आला की आम्ही मदतीसाठी तात्काळ मदतकार्य केले आहे; परंतु आज आमच्याच घरात पाणी पाणी झाले असून आम्ही आमच्या परिसरातील बांधवांना पाहिजे तशी मदत करू शकलेलो नाही. पण प्रयत्न सुरूच आहेत. आणखीन पाण्याचा ओघ सुरू आहे जिथे जशी मदत लागेल तशी मदत करण्यासाठी ज्याने त्याने प्रयत्न करावेत हीच यानिमित्ताने विनंती..!
विशेष करून ज्या भागात पावसामुळे नुकसान झाले नसेल त्या भागातील मित्रांनी जरूर प्रयत्न करावेत.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *