ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आनंदनगर जालना येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन

September 2, 202113:34 PM 55 0 0

(जालना प्रतिनिधी) :- आज दिनांक 01/09/2021 रोजी सकाळी 11.30 वाजता आनंद नगर जालना वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष सविताताई मुंढे जालना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे (पश्चिम), जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने (पुर्व) जालना शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जालना जिल्हा प्रवक्ते ॲड कैलास रत्नपारखी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक घोरपडे, विष्णु खरात, शेख लालाभाई, ज्ञानेश्वर जाधव, सचिन कांबळे, प्रशांत कसबे, प्रा. संतोष आढाव, रवि वाहुळे, विलास नरवडे, नितीन बाळराज, लिहीणार, रमाताई होर्शिल, मैनाबाई खंडागळे यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडी शाखेची स्थापना करण्यात आली.

प्रथम महापुरषाचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले नंतर मान्यवरांचे स्वागत व शाखा उदघाटन करण्यात आले. या शाखेचे प्रमुख आयोजक अमोल लोखंडे, अर्जुन जाधव, शाखाध्यक्ष मनोरंजन लांडगे उपाध्यक्ष आनंद म्हस्के, सचिव प्रदिप गायकवाड, स.सचिव नितीन निकम, संघटक जयेश पाईकराव, सदस्य आर्यन भाग्यवंत, रितेश पाईकराव, सुमित यशवंते, अजिंक्य वाघमारे, क्षितीज गंगातिवरे आदींची शाखेमध्ये सहभाग आहे.
या शाखेच्या कार्यक्रमात उद्याच्या संघटन समिक्ष संवाद दौऱ्यास आनंद नगर मधील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे सविताताई मुंढे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संतोष आढाव यांनी केले. तर आभार अर्जुन जाधव यांनी मानले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *