ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगरपंचायती निवडणूक संदर्भात पेडन्यूजबाबत समिती स्थापन

December 17, 202113:00 PM 51 0 0

जालना, दि. 16 – जालना जिल्हयातील घनसावंगी, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर व तीर्थपूरी या पाच नगर पंचायतीच्या सदस्य पदाचा सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. नगर पंचायत क्षेत्रात उमेदवार, राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये वर्तमानपत्रामधील बातम्यांच्या स्वरुपात आपली जाहिरात करतात. या जाहिरातीचे दृश्य स्वरुप जरी बातमीसारखे असले तरी प्रत्यक्षात प्रसारमाध्यमांना किंमत देऊन अशा बातम्या छापुन आणल्या जातात, अशा बातम्यांच्या संदर्भात आलेल्या तक्रारीवरुन चौकशी करुन निर्णय देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुंषगाने छापील प्रसार माध्यमांवर देण्यात आलेल्या पेड न्यूजच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या या समितीत सदस्य म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, मिडिया प्रतिनिधी, संबंधित नगर पंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे आहेत तर सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *