नांदेड – खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून एक चांगली धम्मचळवळ उभी राहिली असून त्यात काही जातीयवादी लोकांनी अडथळे आणले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे असेच चालू राहिले तर त्यांना धडा शिकवावा लागेल. आम्ही शांतताप्रिय माणसं आहोत. रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. त्यासाठी प्रशासनाने सुद्धा समन्यायी भूमिका घ्यावी. सामाजिक सलोखा बिघडला तर ही जबाबदारी प्रशासनाची असेल. हे होऊ नये यासाठी जातीयवादी लोकांनी धम्मकार्यात अडथळे आणू नयेत असा सज्जड इशारा रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेशदादा सोनाळे यांनी दिला. ते भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. यावेळी भिक्खू संघासह बसपाचे प्रदेश महासचिव दिगांबरराव ढोले, जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ कावळे, बहुजन संघर्ष सेनेचे सुखदेव चिखलीकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक सुभाष रायबोले, चंदू चौदंते, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले, उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले, औद्योगिक विकास कौशल्य मुख्य कार्यकारी अधिकारी कोमलवार, विलास वाठोरे, प्रा. बापुराव वाटोडे, पत्रकार संभाजी कांबळे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, ईश्वर जोंधळे, रणजीत गोणारकर, मुकुंदराव आठवले, लक्ष्मण पांडागळे आदींची उपस्थिती होती.
तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, ऋषीपठण मासिकाचे लोकार्पण, अष्टपुरस्कार, दान पारमिता, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मगान आदी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना बसपाचे जिल्हाध्यक्ष मनिष कावळे म्हणाले की, आम्ही तनमन धनाने खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पाठीशी आहोत. तसेच सर्व धर्म समभावाचा आम्ही पुरस्कार करतो. कुणीही कुणाचे घर उठविण्याचा प्रयत्न करु नये. याचे परिणाम चांगले होत नसतात. बसपा पूर्ण शक्तींनी धम्मगुरू भदंत पंय्याबोधी यांच्या सोबत आहे. येथील धम्मकार्य चांगले आहे. विनाकारण कुणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. या प्रशिक्षण केंद्राच्या विकासासाठी प्रशासनानेही सहकार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर रक्तदान शिबीराचे उद्घाटन रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात २६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. याचनेनंतर भिक्खू संघाने उपासकांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर विविध मान्यवरांनी पंय्याबोधी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. धम्मसंदेश पथक व भिक्खू संघाकडून भदंत पंय्याबोधी यांना भिक्खू संघात अनन्यसाधारण महत्त्व असलेला अष्टपुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच १२० ग्रंथदान कार्यक्रमही घेण्यात आला. साहित्यिक गंगाधर ढवळे संपादीत ‘ऋषीपठण’ या मासिक पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. खुरगावच्या तरुणांनी पंय्याबोधी यांची प्रतिमा भेट दिली. शिवमाला वाटोडे यांनी भिक्खू संघ व उपस्थितांना भोजनदान दिले. पीएचडी संपादन केल्याबद्दल माया भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अनेक उपासक व उपासकांनी विविध वस्तूंचे आणि आर्थिक दान दिले. भीमशाहीर सुभाष लोकडे, सुप्रसिद्ध गायिका माया खिल्लारे, वंदना खिल्लारे यांच्या बुद्ध भीम गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रक्तदान शिबिरासाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने डॉ. सुषमा पांगरकर, डॉ. सबा नौशिन, तंत्रज्ञ एस. डी. नागरगोजे, ब्रदर बालासाहेब भालेराव, परिचर लक्ष्मण येळणे यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंते संघरत्न, चंद्रमणी, मेत्तानंद, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, संघमित्र, सुमेध, सुदत्त, सुनंद, शिलभद्र, शिलानंद, उपासक उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, रवी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, सूरज नरवाडे, संजय नरवाडे, संजय सोनकांबळे, संदिप सोनकांबळे, कपिल बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा इंगोले, प्रा. एस. एच. हि़गोले यांनी केले तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले.
Leave a Reply